सामनेर महात्मा गांधी महाविद्यालय आणि त्यांचे परिसर गुटखा-तंबाखूमुक्त
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय सामनेर चा परीसर तंबाखू, गुटखा मुक्त परीसर घोषित.
पाचोरा (प्रतिनिधी)सामनेर महात्मा गांधी महाविद्यालय शाळेच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे, या संदर्भात शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘तंबाखूमुक्त शाळा’ असा फलक लावण्यात आला; तसेच शाळा तंबाखूमुक्त असल्याचे घोषित करण्यात आले, असे सांगण्यात आले आहे.
पाचोरा तालुक्यातील सामनेर महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथे तंबाखूजन्य पदार्थ , व्यसनमुक्तीवर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी सामनेर केंद्राचे केंद्रप्रमुख दादासो.श्री धीरजसिंग पाटील सर होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक अण्णासो. श्री.व्ही.एस.जाधव सर पर्यवेक्षक श्री.एस.बी.पाटील सर, श्री.आर.आर भोसले सर, श्री.जी.डी.पाटील सर , श्री.ए.एन.चौधरी सर, श्री.एन.ए.वाघ सर, श्री.जी.एस.देशमुख सर, श्री व्ही.बी पाटील सर आणि सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोस्टर निर्मिती, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यालयाच्या गेट समोर व्यसन मुक्तीचे चित्र रेखाटण्यात आले, शाळेचा 100 यार्डचा परीसर तंबाखूमुक्त क्षेत्र घोषित करण्यात आले. या परीसरात धुम्रपान करतांना कोणी व्यक्ती दिसल्यास त्यास 500 दंडाच्या नियमाची अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे.. तंबाखूमुक्त शाळा माॅनिटर यांची निवड करण्यात आली. शिक्षकांमधुन, श्री.वाय के.वंजारी सर, श्री डी.व्ही निकुंभ सर हे शिक्षक प्रतिनिधि निवडण्यात आले, यावेळी विविध भित्तिपत्रकाचे अनावरण केंदप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले.. रंगरंगोटी, फलक लेखनाची जबाबदारी. श्री.आर ए कोळी सर, श्री वाय.जे गांगुर्डे सर यांनी पार पाडली, रांगोळी रेखाटन श्रीमती वसईकर मॅडम, सौ.संगीता पाटील मॅडम यांनी केले, याकामी श्री.एस.पी देहडे सर, श्री.एस.सी.सिसोदे सर, श्री.जी.एम.नानोटे सर, श्री.डी एस पाटील सर यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम आनंदात पार पडला अशी माहिती जी.एम.नानोटे सर यांनी दिली.


