आपल खान्देश
पाचोऱ्यात स्वरसंध्या संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी, जळगाव व कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल शतकपूर्ती सोहळा ‘स्वरसंध्या’ कार्यक्रम दि.१६ फेब्रुवारी २०२३, गुरूवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार तथा अध्यक्ष गोदावरी फाउंडेशन, जळगाव. डॉ.उल्हास पाटील साहेब यांची उपस्थिती होती.
या शतकपूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष मा.श्री मेजर नानासाहेब वाणी हे होते. यावेळी व्यासपीठावर बालरोग तज्ञ डॉ.राजेंद्र पाटील, दीपक चांदोरकर,डॉ.अपर्णा भट, सौ. भारतीताई बागडे ह्या उपस्थित होते. या कार्यक्रमास जळगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




