आपल खान्देश

पाचोरा शहरात उद्या “जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धा – २०२३” विध्यार्थी गुणगौरव सोहळा


पाचोरा (झूम मराठी) अखिल भारतीय मराठा महासंघ, पाचोरा व महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद, जळगांव यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवा निमित्त उद्या १४ जाने. सकाळी ११ वाजता शहरातील स्व. राजीव गांधी भवनात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. साहेबराव थोरात, कार्यक्रमाचे उद्घाटन नारायण महाजन (चाळीसगाव) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार कैलास चावडे, न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गिरिष जगताप, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष किरण पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या गुणगौरव सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, तालुका सरचिटणीस राहुल बोरसे, उपाध्यक्ष सुनिल भोसले, विधी सल्लागार अॅड. सुनिल पाटील, युवक तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, युवक शहराध्यक्ष प्रविण पाटील यांचेसह अखिल भारतीय मराठा महासंघ, पाचोरा युवक मराठा महासंघ पाचोरा शहर व तालुक्याचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे. सोहळा यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख विनोद पाटील, प्रकल्प उपप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, प्रकल्प कार्यवाह चंद्रकांत पाटील, सदस्य प्रा. रविंद्र चव्हाण (पाचोरा), गुणवंत पवार (गोराडखेडा), अरुणा उदावंत (राजुरी), सुवर्णा पाटील (पाचोरा), सिमा पाटील (खडकदेवळा), पंकज देठे (तारखेडा), अभिजीत पाटील (पिंपळगाव हरेश्वर), ज्ञानेश्वर पाटील (राजुरी), नंदकुमार शेलकर हे परिश्रम घेत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे