राजकीय

दौरा पंतप्रधान मोदींचा, अन् चर्चा फडणवीस-अजितदादांच्या राजकीय गोडव्याची

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते आज बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आजी उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर आले. यावेळी त्यांच्यात बराच वेळ गप्पाही रंगल्या. त्यांच्या या मैफलीची खुसखुशीत चर्चा सुरू झाली. ‘एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानांच्या मांडीला मांडी लावून कार्यक्रमात भाग घेतला. दुसरीकडे त्यांच्या या दौऱ्याला विरोध करत संतापही व्यक्त केला. हे फक्त आणि फक्त ‘राष्ट्रवादी’लाच जमू शकते’, अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात मेट्रोच्या उदघाटनापासून ते अनेक कार्यक्रमांचा धडाका लावला. मात्र, या दौऱ्यात व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांच्या गुजगोष्टी रंगल्या आणि अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. व्यासपीठावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप नेते गिरीश बापट आदी मान्यवर उपस्थित होते. मोहोळ आणि बापट तर फडणवीस आणि अजितदादांच्या अगदी जवळ उभे होते. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा रंगल्या. आजच्या त्यांच्यातल्या गप्पा पाहून त्या आठवणींना आपसुकच उजाळा मिळाला. काहीही असो. महाराष्ट्राचे राजकारण इतरांपेक्षा वेगळे आणि एक पाऊल पुढे आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे