‘मुख्यमंत्री माझी शाळा’मध्ये भडगाव तालुक्यातुन पिपंळगाव माध्यमीक विदयालय द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली..
भडगाव | शालेय शिक्षण विभागाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत भडगाव तालुक्यातुन पिपंळगाव माध्यमीक विदयालयाने यश संपादन केल्यामुळे सन्मानचिन्ह देऊन शैक्षणिक आणि पायाभूत विकासासाठी दोन लाखांचा धनादेश स्वरूपात आर्थिक मदत म्हणून मिळाली.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने अभियान राबविण्यात येते, यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत भडगाव तालुका खासगी शाळांच्या गटात दुसरा क्रमांक पिपंळगाव माध्यमीक विदयालयाने पटकवला असून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते हा सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले, सोबत दोन लाखांचा धनादेश स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली, यावेळी गटशिक्षणाधिकारी विश्वास हरी पाटील, गटविकास अधिकारी के. बी. अंजने, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, विस्ताराधिकारी गणेश पाटील, केंद्रप्रमुख बैरागी सर,याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला
पिपंळगाव माध्यमीक शाळेत क्रीडा सुविधांसोबतच शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. शैक्षणिक उपक्रमही यशस्वीपणे राबविण्यात येतात.



