आपल खान्देश

पिंपळगाव हरेश्वर येथे भूषण दादा मगर यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार

 पिंपळगाव हरेश्वर येथे मराठा समाज बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक मा.श्री. भूषण दादा मगर यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. भूषण मगर यांनी कोरोना काळामध्ये रुग्णसेवा करतांना जी सामाजिक बांधिलकी राखत रुग्णसेवा दिली त्याबद्दल त्यांचा छायाचित्र देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी डॉक्टर मगर यांनी कोरोना व्याधींवर सविस्तर माहिती देत कोरोनाची लागण झाल्यानंतर योग्य वेळी योग्य उपचारपद्धतीने उपचार करत पथ्य पाळल्यास आपण कोरोनावर मात करु शकतो परंतु आजही सर्वसामान्य जनतेत कोरोना या आजाराविषयी बऱ्यापैकी समज,गैरसमज असल्याकारणाने समाजात भिती निर्माण होते. तरी अश्या परिस्थितीत घाबरून न जाता थेट माझ्याशी संपर्क साधावा असे अवाहन केले.

Advertising जाहिरात

यावेळेस सरपंच सुखदेव गीते तसेच मराठा समाज अध्यक्ष विक्रम पाटील सर, छायाचित्रकार परशुराम पवार सर, बी डी पाटीलसर, कैलास पाटीलसर, ईश्वर पाटील, गोरख पाटील, गोविंदा येवळे, गोविंदा काळे, नाना पाटील, प्रशांत पाटील, अरुण पाटील, विकास लोहार, राकेश वाघे, गोपाल गावंडे, गणेश भवर,दीपक गरुड, संभाजी जगताप,..पत्रकार .दिपक पाटील राजु निकम. गावातील तरुण मंडळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे