आपल खान्देशकृषीवार्ता

भडगाव तालुक्यातील पीकविमा धारक शेतकऱ्यांना मिळणार 8 कोटी रुपये मदत, अमोल शिंदे यांचा पाठपुरावा यशस्वी..

सलग 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने 25% अग्रीम रक्कम मिळण्याची केली होती मागणी


पाचोरा (झूम मराठी) प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व समावेशक पिक विमा योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांनी एकरुपया भरून आपल्या खरीप हंगामातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी इ. पिकांचा विमा काढला होता. त्या अनुषंगाने पाचोरा व भडगाव तालुक्यात सरासरी प्रजन्यमान फार कमी झाले होते. तसेच जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यात 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे वाया जातील हे निदर्शनास येताच भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विम्याच्या 25% अग्रीम रक्कम नुकसान भरपाई पोटी मिळावी अशी मागणी मा.जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक व प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

तसेच राज्याचे मंत्री ना.गिरीष महाजन व खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून शासन स्तरावर सतत पाठपुरावा करत पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना पिक विम्याच्या 25% अग्रीन रक्कम मिळावी ही मागणी लावून ठेवली होती.पिक विम्याच्या शासन निर्णयानुसार सलग २१ दिवस पावसाचा खंड (२.५ mm पेक्षा कमी पाऊस)पडल्यास शेतकऱ्यांना पिक विम्याची २५% आगाऊ नुकसान भरपाई देय असल्याने अमोल शिंदे यांच्या मागणीला व पाठपुराव्याला यश आले आहे.

भडगाव तालुक्यातील 3 महसूल मंडळ मधील 18,174 शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाई पोटी 8 कोटी 8 लाख 88 हजार 343 रुपये मंजुर झाले असुन शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. व त्यानिमित्ताने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होईल. तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील इतर उर्वरित शेतकऱ्यांसाठी देखील आपला पाठपुरावा सुरू असून त्यासाठी देखील प्रयत्नशील आहे.असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.व ऐन दिवाळीच्या तोंडावर मिळणाऱ्या या मदतीमुळे भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

तसेच या पाठपुरासाठी व मदतीमुळे भडगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांकडून आभार व्यक्त होत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे