लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत Thank Teacher या उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव या शाळेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त Thank Teacher या उपक्रमांतर्गत दि २सप्टेंबर ते ७सप्टेंबर या दरम्यान विविध नाविन्यपूर्ण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यात भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,गीतगायनस्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन केले होते..यात प्रत्येक स्पर्धेतुन प्रथम,व्दितीय क्रमांक निवडण्यात आला… विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केल्या..
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, सचिव डॉ.पुनमताई पाटील यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.. सदर संपूर्ण उपक्रमांचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या उपशिक्षिका संगिता शेलार,सुनिता देवरे,अनिता सैंदाणे,शिक्षक रविंद्र पांडे,अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे,सुयोग पाटील यांनी परिश्रम घेतले
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा