आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्र

Pachora | पाचोऱ्यात उद्धव ठाकरेच्या सभे आधीच संजय राऊत यांचा प्रतिकात्म पुतळ्याचे होणार दहन…!

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

पाचोरा (झूम मराठी ) पाचोरा शहरात रविवारी 23 तारखेला उद्धव ठाकरे यांची महा सभा असून मनसेच्या जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रातून जाहिर केले की या सभे आधी सकाळी 11 वाजता पाचोरा शहरातील जारगांव चौफुलीवर संजय राऊत यांच्या प्रतिकात्म पुतळ्याचे करणार दहन करून निषेध करणार.

काय आहॆ पत्रकात वाचा,  राज  ठाकरे यानी खारघर येथे घडलेल्या घटने संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सदर घटना ही दुखःत असुन या संदर्भात राजकारण होऊ नये, अशा प्रकारची भुमिका मांडली असताना शिवसेना नेते वाचाळविर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर नेहमीप्रमाणे टिका केली असुन त्यांच्या टिकेचा जाहिर निषेध करीत असुन दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जारगांव चौफुली याठिकाणी पुतळा दहन करणार आहोत. संजय राऊत हि व्यक्ती स्वतःला अतिशिय हुशार समजत असुन आपणच या राज्यात एकमेव हुशार व समजदार व्यक्ती असुन इतरांना काहीच समजत नाही, असे समाजात वावरत असतो. त्यांच्यावर व त्यांच्या पक्षावर झालेला आघात ते पचवू न शकल्याने त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली आहे. त्यामुळे ते इतरांना दोष देत असतात व आपला पक्ष काहीतरी मोठी क्रांती करीत असल्याच्या भावनेत सतत वावरत असतात. यदा कदाचित जर भाजपाने सत्तेत अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले असते तर यांच्या पक्ष प्रमुखासह हे लोक भाजपाचे गोडवे गात राहिले असते.

सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता लोकसभेत कुठलाही उमेदवार न देता महागाई, बेरोजगारी, पेट्रोल दर वाढ, नोटबंदी भाजपाने दिलेले आश्वासने या विरोधामध्ये संपुर्ण महाराष्ट्रभर सभा घेऊन भाजपा मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मा.अमित शाह यांना जाब विचारण्याची ताकद महाराष्ट्रातील एकमेव नेत्यात होती. मी म्हणजे सन्माननिय राज साहेब ठाकरे, ज्यावेळी राज साहेब ठाकरे भाजपाला जाब विचारत होते’ त्यावेळी यांचे पक्षप्रमुख व यांचा पक्ष सत्ता उपभोगण्यात व यांची हाजी हाजी करण्यात मग्न होते. म्हणुन अशा तळवे चाटणा-यांनी सन्माननिय राज साहेबांवर टिका करु नये, राजकारणात समिकरण बदलतात तसे मित्रही तुम्ही काहीही केलं ते योग्य आणि इतरांनी केलं तर लगेच पोपट यांची धडपड ना शेतक-यांसाठी ना बेरोजगारांसाठी ना जनतेच्या विकासासाठी यांना फक्त सत्ता मिळवायची असुन यासाठी वाट्टेल त्या विषयावरती राजकारण करण्याची धडपड सुरु आहे. म्हणुन संजय राऊत सारख्या नेत्याने स्वतःच्या मर्यादेत व लायकीत राहुन यापुढे सन्माननिय राज साहेब व पक्षाबदद्ल बोलावे अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, तरी दिनांक 23 एप्रिल रोजी संजय राऊत या मानसिकतेने थकलेल्या वाचाळ विराचा पुतळा दहन करून तीव्र निषेध नोंदवणार आहोत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे