महाराष्ट्र
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारांने सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत जातपंचायती वर न्हावा शेवात गुन्हा दाखल
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारामुळे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत जातपंचायती वर न्हावा शेवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

नवी मुंबई | उलवे नवी मुंबई येथील रहिवाशी रोहन राजू गरुड यांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात दाखल आहे. तरीही सदर घटस्फोटाचा निवडा जातपंचायती द्वारे केला जावा असा दबाव गरुड कुटुंबीयांवर आणला गेला 5 व 55 वाड्याची जातपंचायत भरवून गरुड कुटुंबीयांना जातीतून बहिष्कृत करून वाळीत टाकणे, मारहाण व दंड करू अशा धमक्या फोन वरून व व्हाट्सअप वरून देणे, रोटी-बेटी , मानपान बंद करण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार जातपंचायती द्वारे गेल्या सहा महिन्यापासून चालू केले. त्यामुळे याबाबतची तक्रार अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे गरुड कुटुंबीयांनी केली. त्याचा पाठपुरावा कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा पोलीस स्टेशन मध्ये गोंधळी समाजाच्या पंचावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नंदिनी जाधव, प्रा प्रवीण देशमुख, राजू देशपांडे हे राज्य पदाधिकारी व ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हा गुन्हा दाखल करण्यासाठी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर भटे यांचे सहकार्य लाभले.




