कांग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळाचा निर्णय घ्यावा- संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे
“आधी गोंधळातून बाहेर या, स्वबळाचा निर्णय नंतर घ्या”, संजय राऊतांचा काँग्रेसला खोचक सल्ला!
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमी राजकीय कलगीतुरा रंगताना दिसत असतो. पण राज्यात सध्या सत्ताधाऱ्यांमध्येच राजकीय कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. आणि तो रंगतोय स्वबळावरून! काँग्रेस राज्यात करत असलेल्या स्वबळाच्या भाषेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांमध्ये फटकारलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसला खोचक सल्ला देत त्यांच्या स्वबळाच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे. “त्यांनी आधी पक्षातल्या गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळाचा निर्णय घ्यावा”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.


