सोयगाव तालुक्यात अवैध धंदे जोरात!
सोयगांव(प्रतिनिधी) दिवाळीनंतर सोयगाव तालुक्यातील घोसला बनोटी परिसरात मटका हातभट्टी दारू विक्री मुंबई कल्याण मटका यासारखे अवैध धंदे जोरात सुरू झाले आहेत याकडे पोलिसांचे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
तरुण पिढी या अवैध धंदे यांच्या नादी लागून बरबाद होत असताना दिसत असले तरी पोलिस प्रशासन या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे बनोटी घोसला गोंदेगाव परिसरात मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांची एक्सप्रेस सुसाट धावत आहे, या परिसरात हातभट्टी मटका कल्याण जुगार गुटका यासारखे धंदे मोठ्याप्रमाणात फोफावले आहे.
बनोटी पोलीस चौकी हद्दीतील बनोटी परिसरात अनेक अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने अधिक पैसे मिळवण्यासाठी च्या लालसेने या एरियातील तरुण पिढी या अवैध व्यवसायांच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे.
दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरणा संसर्गजन्य परिस्थिती व त्यानंतर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक संकटात सापडले आहेत अशातच घोसला बनोटी परिसरात खुलेआम सुरू झालेल्या मुंबई कल्याण जुगार गुटखा विक्री सारख्या अवैध व्यवसाय याच्या नादी लागून येथील अनेकांचे संसार देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत घोसला बनोटी परिसरातील गावांमध्ये अवैध गुटखा विक्री जुगार अड्डे मटका खुलेआम सुरू आहे हा सर्व प्रकार खुलेआम सुरू असताना पोलिस प्रशासन गप्प का असा सवाल नागरिक करत आहे.




