Pachora तालुक्यातील गरीब कुटूंबातील करता धरता वारल्यावर, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून मदत निधीसाठी आवाहन
झूम मराठी ऑनलाईन | दिलीप परदेशी
सोशल मीडियाचा विधायक कामासाठीही उपयोग होऊ शकतो, याचा अनेकदा प्रत्यय येतो. अशीच एक घटना व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून घडली. बदरखे येथील तरुण रोहिदास परदेशी ह्याचा एका गंभीर आजाराने उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, आणि त्याच्या पश्चात दोन मुलाच्या भविष्यासाठी मदत निधी व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यामातून आवाहन करण्यात आले, त्यानंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले. गावातील बाहेरगावी असणारे मित्रही समाज बांधव यावेळी मदतीला धावून आले.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याच्या बदरखे येथील तरुण रोहिदास गोरख परदेशी ह्याचा एका गंभीर आजाराने त्याचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, त्याची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने भरसट कुटुंब उघड्यावर आले होते. यावेळी गावातील मित्रांनी एकत्र येत मदत करण्याचे ठरविले, त्याच्या पश्चात दोन मुलाच्या भविष्यासाठी मदत निधी व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यामातून आवाहन करण्यात आले आणि पैसे जमविन्यासाठी गावातील पोलीस पाटील काशिनाथ दगडू परदेशी यांनी जबाबदारी पार पडली, पाच ते सहा दिवसांत एक लाख चाळीस हजार रुपया पर्यंत मदत निधी जमला अजून मदत येत आहे, मुलांना भविष्यात शिक्षणासाठी हा निधी वापरला जाईल त्या हेतूने हा सर्व जमलेला मदत निधी मुलांच्या नावावर बँकेत एफ डी ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
आपण जर मदत करण्यास इच्छुक असाल तर खालील स्कॅनरच्या सहाय्याने मदत करू शकता.




