पाचोरा शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुख पदी अनिल सावंत व दीपक पाटील यांची वर्णी…
पाचोरा शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुख पदी अनिल सावंत व दीपक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पाचोरा तालुक्यात शिवसेनेत उभी फूट पडली. स्थानिक आमदारांसह तसेच शहर प्रमुखांसह अनेक पदाधिकारी हे शिंदे गटात सामील झाले. त्यावेळेस शिवसैनिक अनिल सावंत दीपक पाटील यांनी उद्धव ठाकरे वर विश्वास ठेवत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले होते.

भडगाव पाचोऱ्यात वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शिवसेना (ठाकरे गट) पक्षात अनेक तळागाळातील तरुण जोडले जात आहेत. त्यांना पदाच्या माध्यमातून त्यांचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवनियुक्त शहरप्रमुख दीपक पाटील यांचा जनसामान्यांशी चांगला संपर्क असून, विविध प्रश्नांसाठी ते नेहमीच आवाज उठवत असतात. युवकांचे संघटन चांगल्यापद्धतीने सुरु असून आता पदाच्या माध्यमातून ते अधिक जोमाने काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत, त्यामुळे युवकांचा ओढा पक्षाकडे वाढत आहे. पक्षात प्रामाणिकपणे काम केल्याने आमच्या वर आता शहरप्रमुख पदाची जबाबदारी टाकली आहे, ती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू, असा विश्वास व्यक्त केला.





