आपल खान्देश

अहिराणी दिनदर्शीका२४ चे प्रकाशन छत्रपती संभाजीनगरात मोठया उत्साहात संपन्न

अहिराणी भाषा व संस्कृती सनवर्धना करीता हा एक स्तुत्य उपक्रम आहे


छत्रपती संभाजी नगर (झूम मराठी) जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न.

अहिराणी दिनदर्शीका अहिराणी भाषा व संस्कृती सनवर्धनात मोलाचे योगदान करेल – विकास पाटील

आहिराणी दिनदर्शिकेचे विमोचन (प्रकाशन) छत्रपती संभाजी नगर येथे करण्यात आले. जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फे दरवर्षी अहिराणी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. अहिराणी भाषा व संस्कृती सनवर्धना करीता हा एक स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन विकास पाटील यांनी केले.या वर्षी आपण अहिराणी दिनदर्शीका प्रकाशनाची सुरुवात छत्रपती संभाजी नगर येथे केल्या बद्दल विनायकराव पवार यांनी कौतुक केले तर भाषा व खान्देशच्या सर्व उपक्रमांना या परीसरात वाढवण्यासाठी आम्ही मदत करु असे आश्वासन आण्णासाहेब गायके यांनी दिले. प्रा.दौलतराव सोनवणे यांनी खुमासदार सुत्रसंचलन केले. विनायकराव पवार सर व त्यांच्या संपुर्ण टीमने खूप कमी वेळात शाॅर्ट बट स्वीट कार्यक्रम संपन्न केल्याबद्दल अध्यक्ष विकास पाटील यांनी आभार मानले.

जागतिक अहिरानी परिषद व उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे उपस्थितांना अवाहन केले.या प्रसंगी कैलास पाटील,  सनेर , भैय्या पाटील व विविध मान्यवर उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे