ब्रेकिंग
पाचोरा Live – पाचोरा भडगाव रोड पॅजो अपघातात शेंदुर्णी चे दोघे ठार
पाचोरा भडगाव रोडवरील रस्त्यावर एका पॅजो रिक्षा ला धडक देऊन अज्ञात वाहनधारक फरार झाला आहे या अपघातात शेंदुर्णी चे दोघे जागेवर ठार झाले
दिलीप परदेशी
पाचोरा – भडगाव रस्त्यावर बांबरुडमहादेवाचे गावा नजिक अंतुर्ली फाट्याच्या पुढे शेंदुर्णी येथील पॅजो रिक्षाला एका अद्यात वाहनाने जोरदार धडक देऊन वाहनधारक फरार झाला या अपघातात पॅजो रिक्षा चा चालक व प्रवासी जागीच ठार झाला यात एका मयताची ओळख पटली असून त्याचे नाव भालचंद्र नरसिंह परदेशी रा. शेंदुर्णी त्याच्या खिशातील आधार कार्ड वरुन ओळख झाली असल्याचे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले. मयताच्या घरी निरोप अॅब्लुलन्स चालक निळु पाटील व इतरांना दिला आहे. अपघात झालेल्या पॅजो रिक्षा मध्ये किराणा सामान मोठ्या प्रमाणावर होता. या अपघातात घटनास्थळी कॉग्रेस पदाधिकारी मदत कार्यात होते. पोलीस उपनिरीक्षक चौबे सह इतर सहकारी पोलीस होते





