आपल खान्देश
शिंपी समाज आदर्श महिला मंडळाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
शिंपी समाज आदर्श महिला मंडळाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न…
अध्यक्षपदी छाया इसे, व सचिव म्हणून मनीषा शिरसाठ यांची नियुक्ती…
अमळनेर:- अमळनेर शिंपी समाज आदर्श महिला मंडळाची वार्षिक सभा मंडळाच्या जेष्ठ सदस्या रत्नमाला जगताप यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत नामदेव महाराज मंदिरात संपन्न झाली. मंडळाच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडीत उपशिक्षिका छाया इसे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून सचिव म्हणून मनिषा शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली.इतर कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी नेत्राताई भांडारकर, उपसचिव प्रतिभा सोनवणे, खजिनदार जयश्री शिंपी, जेष्ठ सल्लागार रत्नमाला जगताप, मीनाक्षी खैरनार, उषा भांडारकर तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून मंगला सोनवणे, आशा भामरे, जयश्री भांडारकर, रंजना मांडगे, चंदा खैरनार,भारती भांडारकर, लता खैरनार, सुरेखा जगताप यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रबोधनात्मक विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.




