आँलपिक खेळाडु देश जात पात खडं धर्म मानत नाही!तर– आजही भारतात जात पात पाहून शिक्षण वकृत्व खेळाडू निवडले जातात!उघडा डोळे पहा नीट प्यार बांटते चलो
आता सुरु असलेल्या टोकियो ऑलिंपिक मधील एक चित्रफित पहिली . पुरुष उंच उडीच्या फायनल स्पर्धेत इटलीचा जिॲनमार्को तंबेरी( Gianmarco Tamberi) आणि कतारच्या मुताझ इसा बरशीम( Mutaz Essa Barshim) यांच्यात स्पर्धा सुरु होती सुवर्णपदकासाठी.
दोघांनीही २.३७ मी उंचीच अंतर पार केलं आणि टायब्रेक झाला. तो ही तोडण्यासाठी अजुन तिन संधी दिल्या पण त्यातही तसंच झालं. मग एक शेवटची संधी देण्याचा निर्णय झाला पण इटलीच्या खेळाडुचा पाय दुखावला गेल्यानं त्यानं ही संधी न घेता माघार घेतल्याचं जाहिर केलं. कतारच्या बरशीम समोर आव्हान नसल्यानं त्याचं सुवर्णपदक नक्की होतं मात्र त्यानं पंचांना विचारलं ,”जर मीही ही संधी नाकारली तर आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक मिळेल काय?”
त्यांनी खात्री करुन,”होय” असं उत्तर देताच याने आपणही माघार घेत असल्याचं जाहिर केलं आणि ते दोघेही सुवर्णपदकाचे मानकरी घोषित झाले.
त्याच्या या घोषणेनं अचंबित आणि आनंदी झालेल्या इटालियन खेळाडुन त्याला अत्यंत प्रेमानं मिठी मारुन आपला कृतज्ञताभाव व्यक्त केला आणि दोघांनीही सुवर्ण पदक स्वीकारलं.
सुवर्णपदक स्वीकारल्यावर एकमेकांच्या गळ्यात आपली पदके घालुन त्यांनी हा प्रसंग साजरा केला
केव्हडी हि खिलाडु वृत्ती ,केव्हडा हा त्याग ,केव्हडा हा मनाचा मोठेपणा.
आपल्या जवळची अतिरिक्त वस्तु द्यायला ही आपण जिथं मागंपुढं पहातो तिथं हा सर्वोच्च त्याग करुन एक आदर्शच या कतारच्या बरशीमनं आपल्या पुढं ठेवलाय.
ऑलिंपिक स्पर्धाच मुळात सुरु झाल्या त्या वैश्विक शांतता आणि देशादेशांतील सामंजस्य वाढावं आणि जग एक आहे हे दाखवण्यासाठीच्या उदात्त हेतुनं.
देश ,खंड ,जात ,धर्म ,वर्ण याच्या पलिकडं जात ऑलिम्पिकचे घोषवाक्य #सिटीयस, #अल्टीयस, #फोटीयस म्हणजे जलद, उंच व मजबूत ते हे खेळाडु सार्थ करताहेत.
स्पर्धा असावी वैर नाही.
आपण एकमेकांचे स्पर्धक आहोत शत्रू नाही हे या भावनेनं दाखवलेल्या खिलाडुवृत्तीला सलाम
म्हणुन भारतात संविधान बनविल प्रत्येकाला प्रधानमंत्री राष्ट्रपती होता येईल पण शासक वर्गाने संविधान व्यवस्थित चालवल नाही!त्यामुळे अजुनही जाती पाहुन शिक्का मारला जातो!दुसर्या देश्यात अस होत नाही!भारतात फक्त भ्रष्टाचार करा देश विका हेच धंदे आहे! राष्ट्रप्रेम ही भावना नाही!
द्वेषाला प्रेमानंच जिंकता येतं…
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा