आपल खान्देशआरोग्य व शिक्षणब्रेकिंग

Jalgaon | शिक्षकाकडून लाच घेणारा मुख्याध्यापकाला एसीबीने केले जेरबंद…

एरंडोल | झूम मराठी ऑनलाईन 

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्याच्या पिंपळकोठा जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षकाकडून एक हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. शिक्षण विस्तार अधिकारी यांनी तपासणीचा चांगला शेरा द्यावा यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात येत होती. 

तक्रारदार हे प्राथमिक शाळा पिपळकोठे येथे शिक्षक या पदावर नेमणुकीस आहेत. बळीराम सुभाष सोनवणे, वय 55 हे मुख्याध्यापक आहेत. यातील संशयित आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी यांनी गेल्या सोमवारी त्यांच्या शाळेचे इन्स्पेक्शन केले होते. शिक्षण विस्तार अधिकारी जे डी पाटिल यांनी इन्स्पेक्शन मध्ये चांगल्या शेरा लिहावा म्हणून 10 हजार रुपये मागितले आहेत. ते सर्व शिक्षकांना द्यावे लागतील असे सांगून इतर शिक्षकाकडून प्रत्येकी 1000 रुपये घेतले होते. तक्रारदार व अन्य एक शिक्षक यांचे असे एकूण 2000 रुपये बाकी होते. त्याबाबत तक्रारदार यांचेकडुन 1000 रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे यांनी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी आज दि. 20 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी प्रमाणे साक्षीदार शिक्षक व पंचासमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे, यांनी संशयित शिक्षण विस्तार अधिकारी यांनी 10 हजार सांगितले आहेत तुम्हाला यावेळी पैसे द्यावेच लागतील असे सांगुन तक्रारदार यांचेकडून 1000 रुपये लाचेची मागणी करुन आज दि. 20 रोजी 1000 रुपये लाच रक्कम घेताना बळीराम सुभाष सोनवणे, यांना मुख्याध्यापक कार्यालय पिपळकोठा ता.एरंडोल येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी 2000 रुपये मिळल्या बाबत विरोध दर्शवला नाही व नंतर कॉल करतो असे सांगून लाच रकमेबाबत कोणताही विरोध दर्शवला नाही. सदर बाबत अधिक तपास करून संशयित आरोपी यांच्याविरुद्ध कारवाई करीत आहोत. तसेच एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. सापळा व तपास अधिकारी पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, याच्या मार्गदर्शनाखाली सफौ सुरेश पाटील, चालक पो.ना. बाळू मराठे पोकॉ राकेश दुसाने यांनी तो यशस्वी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे