आरोग्य व शिक्षण

खुशखबर : अवघ्या 5 दिवसांत कोरोना संपणार !

 देशातील पहिल्या अँटीव्हायरल औषधाचा शोध केंद्रीय औषध संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकाने लावला आहे. ‘उमिफेनोविर’ असे या औषधाचे नाव आहे.

या औषधामुळे कोरोना रुग्ण केवळ पाच दिवसात बरे होणार असल्याचा दावा सीडीआरआयने केला आहे. सीडीआरआयचे संचालक तपस कुंडू म्हणाले, 18 ते 75 वयोगटातील 132 कोरोना रुग्णांवर तीन टप्प्यात ‘उमिफेनोविर’ औषधाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला.

यामध्ये विना लक्षणे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरले आहे. डेल्टा व्हेरिएंटविरोधातही हे औषध परिणामकारक ठरेल, अशी आशा आहे. रुग्ण बरे होण्यासाठी उमिफेनोविर 800 एमजीचा डोस दिवसातून दोन वेळा असा पाच दिवस घ्यावा लागेल.

कोरोनाच्या उपचारात उमिफेनोविर गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठीही सुरक्षित आहे. लवकरच उमिफेनोविर टॅबलेट आणि सिरपच्या रुपाने बाजारात येऊ शकते. त्याची किंमतही माफफ असेल, असेही त्यांनी सांगितले. कोरोना महामारी आल्यानंतर संस्थेच्या 16 सदस्यांनी हे औषध प्रायोगिक तत्त्वावर कोरोना रुग्णांना देण्याची मागणी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे