आपल खान्देशमहाराष्ट्र

लोहाराच्या विद्यालयात कृष्णजन्माष्टमी उत्साहात, गोविंदा बनले विद्यार्थ्यांनीं फोडली दहीहंडी…


लोहारा-शहापुरा (प्रतिनिधी दिलीप राजपूत) लोहारा येथील डॉ. जे .जी .पंडित माध्यमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विद्यार्थ्यांचे थरावर थर लावून प्रेम दशरथ पाटील या विद्यार्थ्याने ही दहीहंडी फोडली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक  एस टी चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु .डी .शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच लहान मुलांसाठी सुद्धा विशेष दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या दहीहंडीचा उत्सवाचा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे