ब्रेकिंग

राष्ट्रपतींच्या हस्ते संरक्षण अलंकरण सन्मान प्रदान, महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा गौरव

नवी दिल्ली, 22 : राष्ट्रपती आणि तिन्ही  संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख  रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते आज   संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा समावेश आहे.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आज दोन टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२०’ प्रदान करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार प्रदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिकारी व जवानांना उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि  समर्पण वृत्तीच्या प्रदर्शनासाठी  कीर्ती चक्र, शौर्य चक्र, परम विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक अशा विविध सन्मानाने गौरविण्यात आले.

परम विशिष्ट तसेच अतिविशिष्ट सेवा पदक

महाराष्ट्राचे सुपूत्र एअर मार्शल प्रदीप  बापट यांना परम  विशिष्ट सेवा पदक तर व्हाईस ॲडमिरल किरण  देशमुख ,एअर व्हाईस मार्शल निखिल चिटणीस आणि  एअर कमोडोर मकरंद रानडे यांना अतिविशिष्ट सेवा पदक  प्रदान  करण्यात आले.                              

 कॅप्टन महेश कुमार भुरे यांना असामान्य साहसासाठी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. कॅप्टन भुरे यांनी दहशतवाद विरोधी कार्यवाहीचे अनुकरणीय नेतृत्व करत एका दहशतवाद्याला ठार केले व दहशतवाद्यांना परतवून लावले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे