आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आघाडीत ऐकी, तर युतीसाठी शिवसेना, भाजपाचे तळ्यात मळ्यात?

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया  

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा व भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूकिचे राजकारणातील खलबते सुरु असतांना पाचोरा-भडगाव महाविकास आघाडीत ऐकी दिसून आली,  राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस यांनी एकत्र येत आज पत्रकार परिषदेत “महाविकास आघाडी पॅनल” ची घोषणा केल्याने राजकारणात वेगळेच वळण मिळाल्याने आघाडीच्या कार्यकर्ते आनंदित झाल्याचे दिसून येत आहॆ.

पाचोरा शहरातील माजी आमदार दिलीप वाघ यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेना ठाकरे’गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना ठाकरे’गट जिल्हाप्रमुख दिपक राजपूत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विकास पाटील, शिवसेना (ठाकरे’गट) शरद पाटील यांच्या सह अनेक पदाधिकारीच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करत पाचोरा-भडगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकित महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार व असून पुढील रणनीती आखून कृषी उत्पन्न बाजार समितीत आघाडीची ताकद दाखवून कृ उ बा समिती ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखवू असा निर्धार करत आपली वज्रमूठ बांधली.

आता प्रश्न येतो शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष राज्यात सत्ता असून सर्व ठिकाणी एकत्रित दिसून येतात मात्र जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व भडगावच्या राजकारणात चित्र वेगळे दिसून येते. शिवसेना विद्यमान आमदार किशोर पाटील व भाजपचे अमोल शिंदे हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जात असल्याने भाजप आणि शिवसेना पाचोरा भडगावच्या राजकारणात एकत्र येणार नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहॆ. पाचोरा व भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकिच्या राजकारणातील खलबते सुरु असतांना पुढील रणनीती काय असणार काय चित्र असेल यावर तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे