महाराष्ट्रराजकीय

राज्यात नगरपालिका, महानगर पालिका व जिल्हा परीषद निवडणूका एकाच वेळी होणार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या मुदत येत्या डिसेंबरमध्ये संपणार असून यावर लवकरच निवडणूक आयोगाच्या निवडणुका घेण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. यात 27 जिल्हा परिषदेसह 100 नगरपरिषद व महापालिका निवडणुका होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर 5 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणूका स्थगित झाल्याने उमेदवारांची मोठी पंचाईत झाली आहे. काही ठिकाणी उमेदवारांचा अजूनही प्रचार आणि वारेमाप खर्च सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महापालिकेचा कार्यकाळ हा फेब्रुवारी पर्यंत असणाऱ्या महापालिका निवडणुका मार्च महिन्यात लागतील. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही निवडणूक मिनी विधानसभा सारखी असणार आहे. या निवडणुकीत तब्बल अंदाजे 7 कोटी मतदार आपले स्थानिक प्रतिनिधी निवडणार आहे.

यासोबतच डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या आणि मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. एकूण 15 महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. या निवडणुकीत एकूण अडीच कोटी मतदार असतील. मुदत संपलेल्या महापालिकांमध्ये नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद महापालिकांचा समावेश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे