ब्रेकिंग

पाचोऱ्यात मनसे पक्षाचा झंजावात, दोन शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न..

झूम मराठी वृत्त

पाचोरा (झूम मराठी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक तथा पक्ष प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून तसेच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी दोन शाखांचे उदघाटन पाचोऱ्यात   मोठ्या दिमाखात करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदुत्व भगवा झेंडा खरोखरच भगवा दिसत होता. शाखा उदघाटनासाठी तालुक्यामधील सर्व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यापुढे देखील अशा जल्लोषाने शाखा प्रत्येक गावोगावी, शहरांमध्ये उदघाटन केला जाईल. सन्माननीय राज साहेबांचा मनसैनिक कोठेही कमी पडता कामा नये असं आश्वसन जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी दिले. कोणतीही अडचण आली त्या ठिकाणी आम्ही त्या समूहाला सामोरे जाण्याची ताकद ठेवत आहोत.

पाचोरा शहरात गाडगे बाबा नगर व आठवडे बाजार अश्या दोन महाराष्ट्र नवनिर्माणसेने च्या शाखांचे उदघाटन जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पदाधिकारी निवड ही करण्यात आली, आठवडे बाजार भागात शाखा अध्यक्षपदी चेतन चौधरी उपशाखा अध्यक्ष पदी अजय देसाई व सचिव पदी पवन पाटील सदस्य पदी किरण भोई, मोणू भोई, विकी चौधरी, जय मोची, पवन पाटील, रामदास भोई व व गाडगेबाबानगर भागात शाखाध्यक्ष पदी ज्ञानेश्र्वर लोणारे उपाध्यक्ष पदी गणेश ब्राम्हणे सचिवपदी शुभम मोरे सदस्यपदी ऋषिकेश अहिरे,गौरव पाटील,अनिकेत माने,स्वप्नील भोई, निलेश राठोड यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यावेळी मा.जिल्हा संघटक राजेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष अनिल बागुल तालुकाध्यक्ष शुभम पाटील शहराध्यक्ष ऋषिकेश भोई शेतकरी सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे शहर सरचिटणीस कृष्णा दुंदुले उपाध्यक्ष यश रोकडे व रोहित पाटील शहर संघटक हर्षल अहिरे दीपक गोरखा जितेंद्र नाईक वाल्मीक पाटील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे