नांदगाव येथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
नांदगाव (मुक्ताराम बागुल) बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे शिवसेना तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालय नांदगाव, रेल्वे मालधक्का येथे हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने उपस्थितांना लाडू पेढे व मिठाईचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, डॉक्टर सुनील तुसे, नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख सागर हिरे, राजाभाऊ देशमुख, नूतन कासलीवाल, सचिन साळवे, बाळू देवरे, गुलाब चव्हाण, दीपक मोरे, भरत पाटील, शशिकांत सोनवणे, महिंद्र गायकवाड , मुजू शेख, कपिल तेलोरे, किरण फुलारे, सुनील सोर, रवी सोनवणे, किरण शर्मा, सिद्धेश खरोटे, विकी पवार, प्रकाश शिंदे, हळद शेख, सद्दाम शेख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




