आपल खान्देशराजकीय
पाचोऱ्यात नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधात आघाडीचे निदर्शने! आणि भाजप मलिक विरोधात आक्रमक!
पाचोरा लाईव्ह
पाचोरा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना काल अटक करण्यात आली यां निषेधात महाविकास आघाडीकडून पाचोरा शहरात आंदोलन करण्यात आलं. महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते यावेळी या आंदोलनात सहभागी झाले होते.
दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजपने गुरुवारी पाचोरा शहरांत आंदोलन सुरू केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.



