महाराष्ट्र

मुंबईत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) ३० नोव्हेंबर रोजी एनसीसी महाराष्ट्र डायरेक्टरेट “शहीदों को शत् शत नमन” “आजादी का अमृतमहोत्सव” विजय शृंखला राष्ट्रीय छात्र सेनेच्या विभाग मुख्यालय तर्फे रहेजा कॉलेजमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा विशेष सत्कार करून वीर जवानांचे स्मरण केले. महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीचे कमांडींग आँफिसर कॅप्टन अजित नायर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 

नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या आरंभी एनसीसी छात्र सैनिकांनी देशभक्ती पर गाण्यावर सुंदर फ्यूजन केले.  भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१साली जे युद्ध झाले. आणि  ज्या जवानांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना आपल्या प्राणांची आहुती दिली.त्याच्या नातेवाईकांची या कार्यक्रमात विशेष उपस्थीती होती. त्यांना शाल, श्रीफळ,व स्मृतिचिन्ह देऊन कमांडींग आँफिसर अजित नायर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी, शाळा व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाची सांगता एनसीसी गीत आणि राष्ट्रगीत गाऊन झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे