क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

मुंबई क्राईम ब्रंचच्या टीमने हाय प्रोफाइल रॅकेटचा पर्दाफाश

न्यूज डेस्क – मुंबईत काल रात्री मुंबई क्राईम ब्रंचच्या टीमने हाय प्रोफाइल रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात एका प्रसिद्ध अभिनेत्री व टॉप मॉडेल जुहूमधील फाइव्ह स्टार हॉटेलमधून पकडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र तपासानंतर या दोघांना सोडून दिले. या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती दिलीय. या प्रकरणात इशा खान नावाच्या एका महिला दलालाही अटक करण्यात आली आहे.

याबाबत सीनियर इंस्पेक्टर मनीष श्रीधनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशा खान हिने चौकशीदरम्यान सांगितलं की, हे सेक्स रॅकेट ती गेल्या अनेक वर्षांपासून चालवत होती. पोलिसांना इशा खानबद्दल टीप मिळाली होती. त्यानुसार त्यांनी टीमला जुहू येथील एका हॉटेलमध्ये धाड मारण्यासंदर्भात ऑर्डर दिली होती.

इशा खानची माहिती मिळताच तातडीने क्राइम ब्रान्चच्या एका अधिकाऱ्याने ग्राहक असल्याचा खोटा कॉल केला. यामध्ये त्याने टॉप मॉडल्सची मागणी केली. यानंतर इशा खानने त्यांना अनेक फोटो Whatsapp केले. क्राइम ब्रान्चने यापैकी दोन फोटो सिलेक्ट केले. यामधील एक अभिनेत्री अनेक जाहिरातीत झळकली आहे तर दुसरीने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.

इशा खानने एका तरुणीसाठी दोन तासाचे दोन लाख रुपये असल्याचं सांगितलं. या दोन लाख रुपयात खानला 50 हजार रुपये दिले जातात. तर तरुणींना दीड लाखांची रक्कम दिल्याचं सांगितलं जात आहे.

खोटे ग्राहक बनून पोलीस अधिकाऱ्यांनी जुहूच्या हॉटेलमध्ये एक रुम बुक केला. गुरुवारी रात्री महिला दलाल, मॉडेल आणि अभिनेत्री जशा हॉटेलमध्ये पोहोचल्या. क्राइम ब्रान्चच्या टीमने त्यांना ताब्यात घेतलं. चौकशी करून त्यांना सोडून दिले.

चौकशी दरम्यान मॉडल आणि टीवी अभिनेत्रीने सांगितलं की, कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जाहिराती आणि टीव्ही मालिकांचं शूटिंग बंद होतं. त्यामुळे त्या या व्यवसायात आल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे