समाजसेवक समाधान शिंदे पाटील यांना राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित
सोयगाव तालुक्यातील किन्ही येथिल युवा समाजसेवक समाधान शिंदे पाटील यांना जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या वतीने 2022 सालचा छञपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
समाधान शिंदे यांनी स्वप्नपुर्ती फाउंन्डेशन च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले फाउंन्डेशन च्या मार्फत अनेक रुग्णांचे मोफत मोतीबिंदू आँपरेशन करून गरजूना मदतीचा हात देत असतात रूग्णांची तपासणी मोफत करत समाज हिताचे कामे जोपासली तसेच रक्तदान शिबीरे आयोजित करत असतात,स्वप्नपुर्ती फाउंन्डेशन च्या वतीने त्यांनी युवकांना व्यसनमुक्ती व बेरोजगारी यातुन पुर्णपणे मुक्त करण्याचा पुढाकार घेतला आहे यांच्या या कार्यांची दखल घेत जिजाऊ बहुउद्देशीय सेवा संस्थाच्या वतीने आयोजक सुर्यकांत मोटे यांनी शिंदे यांची दखल घेतली.शिंदे हे वयाच्या 18व्या वर्षापासून समाजसेवेत आहे यापुर्वी त्यांना 2020 साली राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार मिळाला आहे.
समाधान शिंदे यांना दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी वैजापूर येथे मा आमदार रमेश बोरनारे साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी मा कैलास प्रजापती साहेब यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.. यावेळी समाजसेविका श्रमिका दळवी,धनराज आभोंरे,संतोष दौंड यांची प्रमुख उपस्थिती होती
या पुरस्काराने शिंदे त्यांना विविध सामाजिक राजकीय व शैक्षणिक माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. स्वप्नपुर्ती फाउंन्डेशन चे पदाधिकारी व सदस्य संदीप जाधव,सुरज सपकाळ,समाधान भुमे,शिवाजी पाटील,किशोर बारबैले,शुभम दाभाडे, अँड समाधान जाधव, गणेश गोराडे,दिपक राऊतराय,आकाश जाधव,अजय पाटील,दिलीप वाघमारे,धर्मराज तुपे,दुर्गेश जोशी,गणेश नवघरे,एस आय्यर,हर्षेल मोटे,चंद्रकांत सपकाळ,बबलु शेजुळ,रामचंद्र माने,काकासाहेंब सपकाळ यांनी पुरस्कार मिळाल्या शुभेच्छा देऊन सत्कार केला.


