आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा Live 24 – पाचोऱ्यात सामाजिक ऋण व दातृत्व भावना जोपासत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पाचोऱ्यातील जन औषधी मेडिकल स्टोअर्स तर्फे मोफत रुग्णवाहिका सेवा.

 

जेनेरिक मेडिकल स्टोअर्स चे संचालक यज्ञेश कासार व विशाल कासार या दोन बंधूंनी आपली सामाजिक व व्यवसायिक बांधिलकी जोपासत पाचोरा शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी “ना- नफा – ना तोटा” या तत्वावर मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे.

दिलीप परदेशी

पाचोऱ्यातील प्रसिद्ध असे यज्ञेश कसार व विशाल कासार या बंधूंच्या अभिनव उपक्रमामुळे रुग्णांची खूप मोठी सोय झालेली असून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाचोरा सेंट्रल मॉल समोरील नवकार प्लाझा मध्ये कासार बंधूंचे जेनेरिक मेडिकल (जनऔषधी) स्टोअर्स आहे. या जन औषधि मेडिकल स्टोर च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हा अभिनव विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मेडिकल क्षेत्रातील रुग्णांशी असलेली बांधिलकी, सामाजिक ऋण व दातृत्व भावना जोपासत आधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे.

अहोरात्र 24 तास ही रुग्णवाहिका उपलब्ध असेल. पाचोरा येथील कोणताही गरजू रुग्ण फक्त फक्त रुग्णवाहिकेचा इंधन डिझेल खर्च देऊन ही या रुग्णवाहिकेची सेवा उपभोगू शकतो. गरजूंनी 9665538484 व 9028927880 या क्रमांकावर संपर्क करावा असे यज्ञेश कासार यांनी बोलताना सांगितले.

 

 या रुग्णवाहिकेचे मध्ये ऑक्सिजन सुविधा, व्हेंटिलेटर व बाय काप मशीन ची सुविधा देण्यात आलेली आहे. अशा प्रकारची आधुनिक सेवा सुविधायुक्त मोफत रुग्णवाहिका पुरवण्याचा समाजोपयोगी उपक्रम कासार बंधूंनी सुरू केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात व समाजाच्या सर्व थरातून जन औषधि मेडिकल स्टोर चे संचालक यज्ञेश कासार व विशाल कासार यांचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे