आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

घाटात अवैधरीत्या हफ्ता वसुली करणाऱ्या त्या पोलिसांचे अखेर निलंबन!

आ मंगेश चव्हाण यांनी औट्रम घाटात पोलिसांकडून अवैधरीत्या होणाऱ्या वसुलीचा स्टींगद्वारे पर्दाफाश केल्यानंतर, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल्याने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली

झूम मराठी वृत्त 

चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण यांनी औट्रम घाटात पोलिसांकडून अवैधरीत्या होणाऱ्या वसुलीचा स्टींगद्वारे पर्दाफाश केल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. अवैधरीत्या वसुली करणाऱ्या पोलिसांवर आता जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी काय कारवाई करतात? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले असतानाच चौकशी अंती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील चौघा पोलिसांचे शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल्याने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या लाचखोरावर कारवाई!

हवालदार गणेश वसंत पाटील हवालदार प्रकाश भगवान ठाकूर कॉन्स्टेबल सतीश नरसिंग राजपूत कॉन्स्टेबल संदीप भरत पाटील अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत निलंबन काळात कोणतेही खाजगी नोकरी व्यवसाय करू नये असे आदेशात नमूद असून तसे आढळल्यास शिस्तभंग कारवाई करण्यात येईल तसेच गैरवर्तणूक मुळे अनुशेज्ञ असलेला भत्ता कर्मचारी कमावतील असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे