मेहुण्यामुळं फक्त ५९ रुपयांत प्लंबर झाला रात्रीतुन ‘कोट्याधीश,
कटिहार(वृतसंस्था)– बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील मनिहारीच्या केवला पंचायतीमधील हंसवार या छोट्याशा गावातील रहिवासी बबलु मंडलला Dream11 ने १ कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे.१ कोटीची रक्कम मिळाल्यानंतर बबलु मंडलच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे.एवढेच नाही तर,लोक त्याच्या घरी पोहोचुन १ कोटी रुपये जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करत आहेत.
यासंदर्भात बोलताना रातोरात कोट्यधीश झालेल्या बबलुने सांगितले की,त्याच्या पत्नीचा भाऊ,छोटू हा त्याला प्लंबर मिस्त्री कामात मदत करत होता.त्याने बबलुला ड्रीम 11 अँप डाउनलोड करून दिले आणि खेळायला शिकवले.यानंतर बबलुने सुरुवातीला 49 रुपये गुंतवले,यातुन त्याला 200 रुपये मिळाले.पण,यानंतर तो हळूहळू हरू लागला.मात्र रविवारी IPL मध्ये डीसी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेला सामना खेळणाऱ्या दोन्ही संघातील 11 खेळाडू निवडुन त्याने गेममध्ये 59 रुपये लावले होते.
यानंतर त्याला सकाळी मेसेज आला,की तो पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याने १ कोटी रुपये जिंकले आहेत.आता १ कोटी रुपयांवर ३० लख रुपयांचा GST कापुन त्याच्या खात्यात सत्तर लाख रुपये पाठविण्यात आले आहेत.
पक्क घर बांधणार
यानंतर,बबलु म्हणाला,त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.तो त्याचे तुटलेले घर आता पक्के करेल.यानंतर,जे पैसे उरतील ते मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी खर्च केले जातील.याच बरोबर निराधार लोकांना मदत आणि पुजा पाठही केला जाईल.यापुर्वीही एका व्यक्तीने असेच १ कोटी रुपये जिंकले आहेत.


