ब्रेकिंग

खेळताना झाडाखाली सापडला एक लाखाचा आयफोन केला परत, सोहमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक..!

डोंंबिवली | 

जयहिंद काॅलनी भागात मुलांचा एक गट आपल्या सोसायटी परिसरात क्रिकेट खेळत होता. खेळता खेळता चेंडू एका झाडाच्या दिशेने गेला. एक मुलगा तो चेंडू आणण्यासाठी गेला असता, त्याला झाडाखाली एक लाख रूपये किमतीचा आय फोन सापडला  हा फोन ज्याचा कोणाचा असेल त्याला तो मिळावा म्हणून सोहम परदेशी याच्या हस्ते पोलीस निरीक्षक गमे यांनी सापडलेला आयफोन स्वीकारला. सोहमच्या प्रामाणिकपणाचे पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

डोंंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावरील  जयहिंद काॅलनी च्या मैदानात सोहम नरेश परदेशी (वय 12) हा आपल्या मित्रा समवेत क्रिकेट खेळत होता खेळता खेळता चेंडू एका झाडाच्या दिशेने गेला. एक मुलगा तो चेंडू आणण्यासाठी गेला असता, त्याला झाडाखाली एक लाख रूपये किमतीचा आय फोन सापडला. सुरुवातीला सोहमला हा तुटलेला किंवा फेकून दिलेला फुटका मोबाईल असल्याचे जाणवले. त्याने मोबाईल उचलताच तो नवीन आयफोन असल्याचे दिसले. क्रिकेट सोडून सर्व मुले उत्सुकतेने झाडाखाली सोहमजवळ पोहचली. तो नवाकोरा आयफोन १३ असल्याचे स्पष्ट झाले. महागडा फोन झाडाखाली कोणी फेकून दिला असेल किंवा कोणाचा तरी मोबाईल याठिकाणी पडला असावा असा विचार करून सोहम याने आपल्या वडिलांना ही माहिती दिली.

अलीकडे मोबाईलचा वापर चांगल्या कामांबरोबर काही गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी वापरला जातो. असे कृत्य करून अनेक वेळा मोबाईल गटारात, पाण्यात किंवा निर्जनस्थळी फेकला जातो. अलीकडे मोबाईलच्या माध्यमातून चोर आणि चोरी करणारा पोलीस तांत्रिक कौशल्याच्या आधारे तात्काळ पकडतात. सोहमच्या वडिलांनी मुलाकडून मोबाईल फोन ताब्यात घेतला. ज्याचा कोणाचा असेल तर त्याला तो मिळावा असा विचार करून आपल्या मुलाला सोबत घेऊन नरेश परदेशी यांनी विष्णुनगर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी जयहिंद काॅलनीत मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना तेथे कशा पध्दतीने मोबाईल सापडला याची माहिती दिली. पोलिसांनी ही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांना दिली.

पोलीस निरीक्षक गमे यांनी सोहम परदेशीला क्रिकेट खेळताना मोबाईल कसा सापडला याची माहिती घेतली. हा फोन ज्याचा कोणाचा असेल त्याला तो मिळावा म्हणून सोहम परदेशी याच्या हस्ते पोलीस निरीक्षक गमे यांनी सापडलेला आयफोन स्वीकारला. सोहमच्या प्रामाणिकपणाचे पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले. या मोबाईल प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे