आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

श्रीरंग विद्यालयाचे सुनील म्हसकर सर ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार-२०२२’ चे मानकरी

सुनील म्हसकर सर हे शहापूर तालुक्यातील मौजे पाली गावचे सुपुत्र आहेत. ते गेली 24 वर्षे अगदी निष्ठेने व प्रामाणिकपणे अध्ययन-अध्यापनाचे कार्य करत आहेत

श्रीरंग विद्यालयाचे सुनील म्हसकर सर ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२२’ चे मानकरी ठरले

योगेश परदेशी

ठाणे (प्रतिनिधी) ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘दैनिक मुंबई तरुण भारत’ व ‘अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान’ (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गौरव महाराष्ट्राचा’ हा सोहळा अगदी दिमाखदार स्वरूपात संपन्न झाला.

यावेळी श्रीरंग एज्युकेशन सोसायटीच्या श्रीरंग विद्यालयात कार्यरत असलेले उपक्रमशील असे आदर्श शिक्षक सुनील मारुती म्हसकर सर यांस “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२२” या राज्यस्तरीय पुरस्काराने थोर साहित्यिक प्रवीणजी दवणे,आमदार संजयजी केळकर, प्रसिद्ध अभिनेत्री संजिवनीजी जाधव, उद्योजक व संशोधक गंगाधरजी वारके व दैनिक मुंबई तरुण भारत या लोकप्रिय दैनिकाचे संपादक किरणजी शेलार या मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

सुनील म्हसकर सर हे शहापूर तालुक्यातील मौजे पाली गावचे सुपुत्र आहेत. ते गेली 24 वर्षे अगदी निष्ठेने व प्रामाणिकपणे अध्ययन-अध्यापनाचे कार्य करत आहेत. ते उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक आहेत. ते एक उत्तम कवी, गीतकार, लेखक असून ‘शारदासुत’ या टोपणनावाने साहित्य लेखन करतात. त्यांनी 1997 पासून स्वामी विवेकानंद संस्थेची स्थापना करून गेली 25 वर्षे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण व डोंगराळ भागात एक उत्तम संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, साहित्यिक, पर्यावरण संरक्षण, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात ते महत्वपूर्ण योगदान देत आहेत! या आधी त्यांस जागतिक पातळीवरील ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड, २०२०’ हा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्रातर्फे २००५ ला ‘ ठाणे जिल्हा युवा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे! आजतागायत त्यांस विविध संस्था, संघटनांतर्फे शंभरहून अधिक पुरस्कार व सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले आहे! या सोहळ्यासाठी अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान (रजि.) चे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी सर व सचिव हेमंत नेहते सर, डॉ.सोपान बुडबाडकर, डॉ.ज्योती परब, कवी जयंत भावे, जितेंद्र बजाज सर, एनएसजी कमांडो राजू पाटील सर, स्नेहल पवार, सौ.गीतांजली व कुमार रत्नदीप म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात शहापूर तालुक्यातील अतुलनीय सामाजिक कार्य करणारे किसन बोंद्रे, वनविभागात उत्कृष्ठ कार्य करणारे प्रकाश चौधरी, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणारे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक विजयकुमार देसले या शहापुरातील भूमिपुत्रांनाही सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून अगदी मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२२” या राज्यस्तरीय पुरस्काराच्या रूपाने सुनील म्हसकर सरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला असून त्याबाबत सरांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे