शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ₹११ कोटींचा वाढीव विशेष निधी मंजूर

पाचोरा पाचोरा-भडगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
गेल्या वर्षी जून २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील ४,९३४.४७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी सुमारे १० हजार शेतकऱ्यांना मदत मिळणार असून, तब्बल ₹११ कोटींचा सुधारित वाढीव विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद जाधव पाटील यांनी हा निधी मंजूर केला आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता.
या निधीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून, आमदारांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


