आपल खान्देशमहाराष्ट्र

लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेल्या नायब तहसीलदार

कमिशन मागणाऱ्या नायब तहसीलदार व रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्षासह एकास उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे.

  • लाच घेतना नायब तहसीलदारांसह (पुरवठा) तिघांना अटक
  • ६ हजार ६९३ रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली होती
  • ३ महिन्याचे ४४ हजार ६२३ रुपये बिल काढण्यासाठी मागितली होती लाच

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात आलेले मोफत धान्य वाटप केल्याच्या बदल्यात रेशन दुकानादाराना त्याचा मोबदला म्हणून एका क्विंटलच्यामागे १५० रुपये प्रमाणे शासनाकडून बिल दिले जाते. मात्र, रेशन दुकानदारांना हे बिल मिळण्यासाठी ६ हजार ७०० रुपयाची लाच घेतल्याची घटना घडली आहे. सदर लाच घेतल्याप्रकरणी नायब यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एका दुकादाराने दिलेल्या तक्रारीवरून सदर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

३ महिन्याचे ४४ हजार ६२३ रुपये बिल काढण्यासाठी मागितली होती लाच

तक्रार केलेल्या रेशन दुकानदाराचे तीन महिन्याचे बिल काढण्यासाठी सदर लाचेची मागणी करण्यात आली होती. रेशन दुकानदाराचे ४४ हजार ६२३ रुपये बिल काढण्यासाठी ६ हजार ६९३ रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यातील ६ हजार ७०० रुपये स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

राज्य सरकारने प्रत्येक रेशन दुकानातून मोफत धान्य वाटप केले होते

कोरोना काळात लॉकडाउन दरम्यान लोकांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य सरकारने प्रत्येक रेशन दुकानातून मोफत धान्य वाटप केले होते, या धान्याचे मोफत वाटप केल्याच्या बदल्यात दुकानदार याना मेहनताना स्वरूपात कमिशन देण्याचा निर्णय घेत काही रक्कम दिली मात्र ही रक्कम वाटप करताना त्यात कमिशन मागणाऱ्या नायब तहसीलदार व रेशन दुकान संघटनेचे अध्यक्षासह एकास उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदार याच्याकडून बिलाच्या रकमेचे पंधरा टक्के रक्कम मागण्यात आली होती

तक्रारदार याच्याकडून बिलाच्या रकमेचे पंधरा टक्के म्हणजे ६ हजार ६९३ रुपये लाचेची मागणी करून आरोपी डोंगरे यांच्या मार्फतीने पंचांसमक्ष ही लाचेची रक्कम स्वीकारलेने कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येत आहे. कळंब तहसील कार्यालय येथील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार श्रीमती परविन उमर दराज खान पठाण ( वय ४७ वर्ष ) यांच्यासह कळंब तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनाचे अध्यक्ष श्रीरंग साधू डोंगरे ( वय ६४ वर्ष रा. कोथळा, तालुका कळंब ) स्वस्त धान्य दुकानदार विलास ज्ञानोबा पिंगळे ( वय ५५ वर्ष, राहणार पाथर्डी, तालुका कळंब) या ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे