आपल खान्देश

धुळ्यात राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णया विरोधात निदर्शने

सरकारच्या मनमानी निर्णयाला आज संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चा, धुळे च्या वतीने सर्व महिला व युवकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला

झूम मराठी वृत्तसेवा

धुळे: नुकताच आघाडी सरकारने मंत्रिमंडळ च्या मान्यतेने महाराष्ट्रात किराणा दुकान व मॉल वर खुलेआम दारूविक्रीला परवानगी दिली. थोरमोठ्या महापुरुषांची पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्राची इतकी वाईट अवस्था सरकारला करण्याचा अधिकार नाही. सरकारच्या मनमानी निर्णयाला आज संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चा, धुळे च्या वतीने सर्व महिला व युवकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एवढा मोठ्या पदावर असतांना असा चुकीचा निर्णय घेऊन महाराष्ट्रात खुलेआम किराणा दुकानात परवानगी देऊन आपण महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनातून आमचे पालन हार, हितचिंतक मुख्यमंत्री म्हणून अधिकार गमावला आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

किराणा दुकानात दारू मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील तरुण पिढीचे आयुष्य व्यसनाधीन होणार असून सुलभतेने मिळणाऱ्या दारूमुळे घराघरात व्यसनी युवक तयार होतील. महिलांच्या सुरक्षिततेच्या व्यसनाधीन लोकानंमुळे धोका निर्माण होईल, छेडखाणी चे प्रकार वाढतील अराजकता माजेल.अत्यंत चुकीचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होईल.अजूनही संधी गेली नाही. हा विध्वंसकारी निर्णय सरकारने मागे घ्यावा जर आपण खुलेआम किराणा दुकानात दारूविक्रीचा निर्णय मागे घेतला नाही. तर संपूर्ण धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील महिलांचे शिव्याशाप सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही.

यानंतर धुळ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दारूविरोधी व सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चा, धुळे च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देऊन घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी गीतांजलीताई कोळी,अलका कापूरे, चेतन उपाध्याय हिरालाल कोळी, मनोहर कोळी, अमोल नवसारे, वर्षा साळवे, ललिता कोळी, प्रमिलाताई कोळी, वैशाली पाटील, भारती साळवे, मनीषा साळवे, संगीताबाई साळवे, शालूताई साळवे, ज्ञानेश्वरी बिडवे, स्नेहा बडगुजर, प्रियंका विसपुते आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे