आपल खान्देशब्रेकिंग

पाचोऱ्यात राहणाऱ्या माजी सैनिकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

पाचोरा टुडे | पाचोऱ्यातील राधाकृष्ण कॉलनीत राहणाऱ्या प्रवीण पाटील नावाच्या माजी सैनिकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाचोऱ्यातील भडगाव रोड वरील राधाकृष्ण कॉलनी परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेले माजी सैनिक प्रवीण पाटील (वय 45) हे 01 ऑगस्ट 2025 रोजी नुकतेच निवृत्त झाले होते, त्यांचे मूळ गांव अंजन विहिरे असून आपण निवृत्ती नंतर पाचोऱ्यात निवांत राहू या आशेने ते काही महिन्या पूर्वी राधाकृष्ण कॉलनी परिसरात त्यांनी घर घेतले होते, त्यांना आज दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना दवाखान्यात नेले असता त्यांच्या वर उपचार करत असतांना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राण ज्योत विझल्याने पाचोरासह अंजन विहिरे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मयत माजी सैनिक प्रवीण पाटील ह्यांनी 27 वर्ष देश सेवेसाठी दिले होते, ऑपरेशन सिंधूर 25 मध्ये त्यांच्या विशेष सहभाग होता, निवृत्ती नंतर आपण आंनदाने परिवारासह पाचोऱ्यात राहू म्हणून ते पाचोऱ्यात राहत होते मात्र त्यांच्या वर काळाने घाला घातला त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे