सोशल मीडियावर चांगला फोटो लावायचा आणि त्यानंतर धनाढ्य व्यक्ती हेरून त्यांना जाळ्यात अडकवायचे, अशा पद्धतीने अनेक घटना रोज उघडकीस येत आहेत.आता पुण्यात पुन्हा अशीच एक घटना उघडकीस आली असून आरोपी तरुणीने अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीला तब्बल साडेपाच लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. सोशल मीडियातील या भामट्यांवर अंकुश लावण्यात यंत्रणा देखील कमी पडताना दिसत आहे तर नागरिक देखील तसल्या मोहापायी यांच्या जाळ्यात अडकत आहेत.
उपलब्ध वृत्तानुसार, पुण्यातील धानोरी येथील रहिवासी असणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर झिनत शर्मा नावाच्या एका तरुणीशी मैत्री झाली होती. दिसायला सुस्वरूप असलेली झीनत पाहून पीडित व्यक्तीला देखील तिच्या संपर्कात राहण्याची आवड लागली. त्यानंतर त्यांच्यात सोशल मीडियावर बातचीत होऊ लागली. एकेदिवशी अचानक झिनतने फिर्यादीला फेसबुक मेसेंजरद्वारे कॉल केला त्यावेळी संबंधित तरुणी पूर्णपणे नग्न अवस्थेत होती. तिने काहीवेळ नग्न अवस्थेत चाळे केल्यानंतर तिने फिर्यादीलाही तसं करण्यास भाग पाडलं
फिर्यादी सुरुवातीला तिला नकार देत होता मात्र त्यानंतर आपल्या मैत्रीचा हवाला देत तिने त्याला कॅमेऱ्यासमोर नग्न होण्यास भाग पाडले. आरोपी तरुणीनं संबंधित सर्व प्रकार स्क्रीन रेकॉर्डरद्वारे आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह केला आणि त्यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, आरोपी तरुणीने पैशाची मागणी केली. तरुणीच्या दबावाला बळी पडत बदनामीच्या भीतीनं फिर्यादीनं आरोपी तरुणीच्या दोन बँक खात्यात तब्बल 5 लाख 54 हजार 100 रुपयांची रक्कम पाठवली.
तब्बल 5 लाख 54 हजार 100 मिळूनही तरुणीची हाव मिटत नव्हती . यानंतर आरोपी तरुणी फिर्यादीकडे आणखी पैशांची मागणी केली. शेवटी आरोपी तरुणीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीनं विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात झिनत शर्मा नावाच्या फेसबूक मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना 29 मे 2021 रोजी घडली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस गुन्ह्याचा तपास करत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा