पाचोरा – येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष गोवर्धन देवचंद जाधव व त्यांची बहीण गंगुबाई मोतीलाल पवार यांनी दिनांक 16 / 9 / 2019 रोजी समाजासाठी स्व मालकीचा भूखंड विनामूल्य दान करून समाजासमोर दातृत्व भावनेचा खूप मोठा आदर्श निर्माण केला आहे.
जळगाव जिल्ह्यात नावलौकिक असलेले व चर्मकार समाजासाठी धावून जाणारे समाजासाठी अनमोल वेळ देणारे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष
गोवर्धन जाधव यांनी आपली स्वसंपादित जागा बहिणीला देऊ केली होती. मात्र दोन्ही भाऊ – बहिणीने उदार अंतःकरणाने आपला भूखंड संत शिरोमणी गुरु रविदास बहुद्देशीय संस्था या संस्थेच्या नावे लावून आदर्श निर्माण केला आहे. त्याबाबतचे लेखी संमती
पत्र व प्रतिज्ञापत्र त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडे आज सुपूर्द केले. समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून सदर पाचोरा येथील जागेचा अधिकृत ताबाही
समाजाकडे दिला आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव यांनी संत गुरु संत शिरोमणी गुरु रविदास बहुद्देशीय संस्था या संस्थेच्या नावे लावून समाज मंदिरासाठी जागा आज त्यांच्या ताब्यात दिले तरी समाज बांधवांनी समाज मंदिरासाठी त्याचे उपयोग करावे व सदर संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे समाज मंदिर सामाजिक संस्कृती व शैक्षणिक कार्यासाठी याचा उपयोग करावे ही नम्र विनंती व सन्माननीय आमचे नेते बबनराव घोलप साहेब व राष्ट्रीय चर्मकार समाजाची खानदेशी मुलुख मैदान तोफ कार्याध्यक्ष भानुदास विसावे राज्याचे उपाध्यक्ष समाजभूषण पांडुरंग अण्णा बाविस्कर जिल्हाध्यक्ष नाना भाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करून माननीय गोवर्धन देवचंद जाधव तालुकाध्यक्ष यांनी समाजासाठी फार मोठे योगदान करून समाजाला एक नवी दिशा दिलेली आहे
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा