आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची मोठी कारवाई; दोन 12 चाकी डंपर जप्त.!

पाचोरा, प्रतिनिधी : माननीय प्रांताधिकारी भूषण आहिरे यांच्या आदेशानुसार पाचोरा भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात टास्क फोर्सने मोठी कारवाई करत मौजे वाक येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन 12 चाकी डंपर पकडले. संबंधित वाहने जप्त करून ती पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय, पाचोरा येथे जमा करण्यात आली आहेत.

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महसूल विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

या कारवाईत टास्क फोर्सच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पथकात आर. डी. पाटील (मंडळ अधिकारी), राहुल पवार (मंडळ अधिकारी), संजय सोनवणे (ग्राम महसूल अधिकारी), अतुल पाटील (ग्राम महसूल अधिकारी), अविनाश जंजाळे (ग्राम महसूल अधिकारी), अजमल शहा मकानदार (ग्राम महसूल अधिकारी) आणि निखिल बळी (ग्राम महसूल अधिकारी) यांचा समावेश होता.

पाचोरा भडगावच्या महसूल विभागाच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे