स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कृषी विभागामार्फत भडगाव तालुक्यात विविध उपक्रम..
झूम मराठी वृत्त
भडगाव (झूम मराठी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तालुक्यात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध गावांत शेतकरी प्रशिक्षण तसेच शेती शाळा वर्ग घेण्यात आले. तालुक्यात कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प अंतर्गत निवड गावांत महोत्सवाचा एक भाग म्हणून दि. 14 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे साहेब यांनीही सदर प्रशिक्षणामध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये वडजी येथील शेतकऱ्यांना शेती शाळा दरम्यान नॅटमॅट तंत्रज्ञान व गुलाबी बोंडअळी नियंत्रण विषयी डॉ रशिद , नॅटको शास्त्रज्ञ , हैदराबाद यांनीही मार्गदर्शन केले त्याचबरोबर शिवणी येथील शेतकऱ्यांना कापूस पिकावरील बोंड अळी नियंत्रणाबाबत तसेच फेरोमोन ट्रॅप वापरणे बाबत क्षेत्रीय स्तरावर जाऊन तालुका कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक 14 ऑगस्ट रोजी गुढे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सेंद्रिय शेती मार्गदर्शन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास धुळे येथील डॉ. रविंद्र चौधरी यांनी लिंबू पिकावरील कीड रोग व ऊस पिकावरील पांढरी माशी नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले तसेच मा उपसंचालक भोकरे साहेब यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण , एकात्मिक कीड नियंत्रण मध्ये फेरोमोन सापळ्यांचे महत्त्व व जैविक किड नियंत्रण याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच मळगाव येथेही विविध उपक्रमात तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे साहेब यांनी दशपर्णी अर्क , निंबोळी अर्क , वेस्ट डी कंपोजर , एस नाईन कल्चर चा वापर, कृषीक अँपचा वापर, आंतरपीक, मिश्र पिक, पिवळे चिकट सापळे वापर, निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत व सेंद्रीय कापूस उत्पादकता वाढ प्रकल्पांतर्गत कापूस गुलाबी बोंडअळी नियंत्रणात जैविक किटकनाशकांचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले, तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय भडगाव येथे 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन कार्यक्रमानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुका सिडफॉर्म येथील 5 टक्के निंबोळी अर्क चे 5 लिटरचे 50 कॅनचे वाटप करून शेतकऱ्यांची रॅली काढण्यात येऊन शेतकऱ्यांमध्ये निंबोळी अर्क वापरण्याविषयी व ते तयार करणे विषयी जागरुकता निर्माण करण्यात आली तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी फेरमोन सापळे व कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी बीबीएफ तंत्रज्ञान वापर विषयी प्रत्यक्ष तालुका सीड फार्म येथे प्रत्यक्ष क्षेत्रावर तालुका कृषी अधिकारी गोर्डे साहेबांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर तालुका कृषी कार्यालय येथे निंबोळी अर्क मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी निंबोळी अर्क चा लाभ घेणे बाबत कृषी विभागामार्फत आव्हान करण्यात आले.
सदर कार्यक्रम सुखदेव गिरी ,सचिन पाटील , प्रदीप महाजन , एस टी राठोड , रणजित राजपूत ,आर बी राठोड , मंडळ कृषी अधिकारी धनंजय पाटील यांनी सदर महोत्सवांतर्गत विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.



