गुन्हेगारी

नाशिक पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

झूम मराठी वृत्त

नाशिक (प्रतिनिधी) नाशिकच्या अंबड पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासह पोलिसांनी तीन आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे.

सूरज नामदेव गायकवाड, प्रथमेश राजेश छाजेड आणि समाधान देविदास निकम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संशयित आरोपी सूरज नामदेव गायकवाड, प्रथमेश राजेश छाजेड या दोघांची गोपनीय माहिती सपोनि गणेश शिंदे यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सुरज आणि प्रथमेश या दोघा संशयित आरोपीना ताब्यात घेतले.

या दोघांकडून पोलिसांना 46 हजार रुपयांचे 6 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल मिळून आहे. तर दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अंबड मध्ये काही दिवसांपूर्वी मोबाईल चोरून नेण्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना समाधान निकम याची माहिती मिळाली. याही आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून याही आरोपी कडून 168000 रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल मिळून आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे