नामशेष होत असलेली खान्देशातील पानवेल शेती वाचवा-खा उन्मेश पाटील
पानवेल शेतीस विमा संरक्षण देण्याची गरज खासदार उन्मेशदादा पाटील यांची कृषीमंत्री यांचे कडे पत्राद्वारे मागणी
पानवेली शेती खान्देशच्या कृषी इतिहासाचे सुवर्ण पान
जळगाव – एके काळी जिल्ह्यात शेकडो एकरावर पानवेल (विड्याची पाने) लागवड केली जात होती.माञ पानवेल लागवडी करिता आज पर्यंत शासनाकडून कुठलेही प्रोत्साहनपर योजना/ अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही तसेच कमी/जास्त पाऊस, तापमान व वादळामुळे पानतांड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका मागील कालावधीत बसलेला आहे. या कारणाने पानवेल लागवड करणारे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहे. तसेच यावर्षी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने पानतांडे पूर्णपणे खराब झालेले असून शेतकऱ्यांना कुठलंही उत्पन्न यापासून मिळणार नाही. अशी विचित्र परिस्थितीचा. पानवेल शेतकऱ्यांना सात्यत्याने सामना करावा लागतो आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी किमान पानवेल या पिकाकरिता विमा योजना लागू करणेबाबत शासनाने आग्रही भूमिका घ्यावी आणि नामशेष होत असलेली खान्देशातील पानवेल शेती वाचवावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे
आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नमूद केले आहे की जळगाव जिल्हयातील शिरसोली ता.जळगाव व कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ या ठिकाणी शेतकरी पारंपरिक पद्धतीने नागवेल/पनवेलीची लागवड करित असतात.
जळगाव जिल्ह्यात पानतांड्याचे लागवड क्षेत्र आजमितीस 31.40 हे. (जळगाव – 18.00 हे. व भुसावळ – 13.40 हे.) आहे.
मी व्यक्तिशः सदरील पिकाबाबत माहिती घेतली असता मागील ६ ते ७ वर्षापासून लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सात्यत्याने कमी होत असून पानतांडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांसमवेत चर्चा करीत असताना असे लक्षात आले की पानवेल लागवडी करिता आज पर्यंत शासनाकडून कुठलेही प्रोत्साहनपर योजना/ अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही तसेच कमी/जास्त पाऊस, तापमान व वादळामुळे पानतांड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका मागील कालावधीत बसलेला आहे. यामुळे पानवेल लागवड करणारे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. तसेच यावर्षी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने पानतांडे पूर्णपणे खराब झालेले असून शेतकऱ्यांना कुठलंही उत्पन्न यापासून मिळणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. यावर राज्य सरकारने लक्ष द्यावे.
पानवेली शेती खान्देशच्या कृषी इतिहासाचे सुवर्ण पान
एकट्या शिरसोली परीसरात बारी समाजासह अनेक शेतकरी बांधवांच्या पिढ्यान पिढ्याकडून ही शेती केली जात होती. राज्य सरकारने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, पानवेल संशोधन केंद्र, कृषि विभागातील अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा करून तात्काळ पानवेल लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता विमा योजना लागू करावी जेणेकरून शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने जतन केलेले पानवेलीचे पिक नामशेष होणार नाही व शेतकऱ्यांना होणारे आर्थिक नुकसान कुठेतरी कमी करणे शक्य होईल.पानवेली शेती खान्देशच्या कृषी इतिहासाचे सुवर्ण पान असून ही परंपरागत शेती जतन करण्यासाठी कृषी मंत्री ना. दादाजी भुसे आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.


