आपल खान्देश

अतिक्रम काढण्यासाठी बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केला हल्ला

जामनेर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रम काढण्यासाठी गेलेल्या पथकासोबत बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केल्याची घटना जामनेर तालुक्यातील लोणी येथे घडली. या घटनेत पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनाही मुका मार लागला आहे. दरम्यान, याप्रकरणी सहा जणांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा

जामनेर तालुक्यातील लोणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत ग्रामपंचायतस्तरावर रीतसर तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून बंदोबस्त मागवण्यात आला होता. त्यानुसार पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, उपनिरीक्षक एस.पी. बनसोड, किरण शिंपी, विद्या छाडेकर, दिनेश मारवळकर, अनिल सुरवाडे आदी कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्ताला गेले होते. यावेळी अतिक्रमणधारकांनी कारवाईस विरोध केला. अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटवण्याबाबत सांगितल्यानंतर पो नी अरुण धनावडे यांना शिवीगाळ केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे