गुन्हेगारी

चारित्र्यावर संशय घेतात म्हणून सुनेने केला सासऱ्याचा खून!!

चारित्र्यावर संशय घेतात म्हणून सुनेने केला सासऱ्याचा खून, आरोपी सून पोलिसांच्या ताब्यात, अहमदनगर येथील घटना

घरात वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याचा राग आल्याने सुनेने ६२ वर्षीय सासऱ्याचा खून केला. हा प्रकार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात मंगळवारी सकाळी घडला. अर्जुन गोविंद हजारे (वय ६२, रा. चिचोंडी पाटील) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बाबासाहेब चंदू बनकर ( ४२, रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सून ज्योती अतुल हजारे (रा. चिंचोडी पाटील) हिच्याविरूद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

अर्जुन हजारे हे सून ज्योतीवर कायम संशय घ्यायचे. या कारणावरून मंगळवारी सकाळी त्यांच्यात भांडण झाले. भाऊ हजारे यांच्या घरासमोरील रस्त्यावरच हे भांडण सुरू होते. या भांडणात ज्योतीने अर्जुन हजारे यांच्या डोक्‍यात, कपाळावर, तोंडावर दगड व कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत अर्जुन हजारे गंभीर जखमी झाले. अन त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

शवविच्छेदनसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल केला होता. या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सून ज्योती हजारे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास प्रभारी सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बोराडे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे