आपल खान्देश

रावेरतालुक्याच्या चिनावल मध्ये पाचपट पैसे देणारं एटीएम, गावकऱ्यांना लागली 6 लाखांची लॉटरी

 जळगाव : तुम्ही एटीएममध्ये गेलात आणि 500 रुपये काढण्याची कमांड दिलीत. पण तुमच्या हाती अडीच हजार रुपये आले तर? लॉटरी लागल्यासारखं वाटेल की नाही? जळगावच्या रावेरमध्ये चिनावलच्या ग्रामस्थांना खरोखरच अशी लॉटरी लागली.

चिनावलच्या एसटी बसस्टँड परिसरातल्या एटीएममधून पाच पट पैसे बाहेर येत होते. ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुफान गर्दी झाली. एटीएममध्ये टाकलेल्या रकमेच्या पाच पट पैसे निघत असल्याने इंडिकॅशच्या एटीएमवर संध्याकाळी 6 ते रात्री 8.30 या वेळेत नागरिकांनी एटीएममधून तब्बल सहा लाख रुपये काढले.

याबाबत इंडिकॅश एटीएमच्या अधिकारऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत एटीएम बंद केलं.

या प्रकरणाची नोंद अद्याप पोलीसांच्या डायरीत झालेली नाही. पण सुरक्षेसाठी बँकेचे अधिकारी आणि पोलीस एटीएममध्ये तळ ठोकून आहेत

.एटीएममध्ये नोटा भरताना ब्लॉक सेटिंग चुकीचं झालं असेल किंवा मशिनच्या सेटिंगमध्ये काही बिघाड झाला असेल, अशी शक्यता लोडिंग कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे. अर्थात, व्यवस्थित तपासणीनंतरच नेमकं काय घडलं ते समोर येणार. शिवाय अतिरिक्त आलेले पैसे वसूल करण्याचं आव्हानही एटीएम चालवणाऱ्या टाटा इंडिकॅश समोर आहे. मात्र सध्या तालुक्यात चर्चा आहे ती या लॉटरीवाल्या एटीएमचीच.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे