आपल खान्देशमहाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! पोषण आहारात चक्क प्लास्टिकचे तांदूळ!!

कार्यकारी संपादक –  निलेश पाटील 

नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! पोषण आहारात चक्क प्लास्टिकचे तांदूळ!!

नांदेड जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातील प्लास्टिक तांदुळ असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील किनवट तालुक्यात येथे समोर आला आहे. हा तांदूळ प्लास्टिक सदृश्य असून या तांदळामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे

किनवट (नांदेड)कोसमेट येथील जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! पोषण आहारात प्लास्टिकचे तांदूळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहे या प्रकारात कडक कारवाई करा अशी मागणी देखील आता जोर धरू लागली

शालेय पोषण आहार देताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय. हा प्रश्न आता पुन्हा एकदा समोर आला आहे. त्याला कारण देखील तसेच आहे.किनवट (नांदेड)कोसमेट येथील जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या पोषण आहारामध्ये चक्क प्लास्टिक आढळून आली आहे. त्यामुळे आता पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकांनी जिल्हाधिकरी यांच्याकडे निकृष्ट आहाराबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकारात तातळीने चोकशी व्हावी यासाठी प्रसासनाने आदेश दिले आहेत

यापूर्वी देखील अनेक ठिकाणच्या पोषण आहारांमध्ये अळ्या, पाल आढळ्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये आता या प्रकरणाची भर पडली आहे. त्यामुळे पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. दरम्यान, पोषण आहार पुरवणाऱ्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे