आपल खान्देशमहाराष्ट्र

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भडगाव व पाचोऱ्यातील विकासकामांचा लोकार्पण

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पाचोरा व भडगाव शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेने केलेल्या कामांचे कौतुक केले.

दिलीप जय परदेशी

पाचोरा |  नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यात आणि पाचोरा भडगाव तालुक्यात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.

पाचोरा व भडगाव विधानसभा मतदार संघातील विकास कामे विविध विकास कामे करण्यात आली आहे. ही काम उत्कृष्ट दर्जाची केलेली आहेत, त्यामुळे भविष्यात अश्या कामांसाठी निधी लागल्यास नगरविकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

पाचोरा भडगाव मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी व प्रश्न समजुन काम केल्यानेच पाचोरा शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल होत आहे असे भाषणात त्यांनी पाचोरा शहरांची स्तुती केली

भडगाव शहरासाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेला जलसंपदा विभागाची ना हरकतीची अडचण दुर करून त्या योजनेला लवकरच मान्यता देऊ तर जुने मटन मार्केट ते पेठ भागाला जोडणाऱ्या पुलासाठीही आवश्यक निधी देण्याचे आश्वासन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

या लोकार्पण कार्यक्रलमाला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य व पंचायत समितीचे सदस्य तसेच स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव महापौर, उपमहापौरांकडून मंत्री ना.एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून  त्यांनी आज मनपाला भेट दिली. महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी ना.एकनाथ शिंदे यांचा चांदीची गदा देऊन तर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा चांदीची तलवार देऊन सन्मान केला.

डॉ.अस्मिता पाटलांचा ना.एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश कारण्यात आला

भडगाव नगर पालिकेमार्फत कारण्यात आलेल्या विविध विकास कामाचा लोकार्पण करण्यात आला

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे